पहिले नग्न व्हिडीओ नंतर महिलेचे शारिरीक शोषण!

दोघांना अटक तर एका फरार

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
वर्धा,
wardha-news : शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणा-या ३१ वर्षीय विवाहितेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ तिच्याच ओळखीच्या एका महिलेने रेकॉर्ड केला. त्यानंतर हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन पुरुषाने पीडितेचे शारिरीक शोषण केल्याची धक्कादायक बाब तक्रारीनंतर पुढे आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून एक महिला व दोन पुरुष असे तिघांवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
k
 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. मार्च २०२५ मध्ये तिची ओळख मेहंदी लावण्याचे काम करणा-या एका महिलेसोबत लग्न सोहळ्यात झाली. त्यानंतर त्यांच्यात ओळख वाढली. याच ओळखीचा फायदा घेत महिला आरोपीने महिलाना मसाज करून दिल्यास तुम्हाला तुमचा मोबदला दिल्या जाईल असे सांगितले. पीडितेनेही महिलांनाच मॉलीश करायची असल्याचे काम असल्याने होकार दिला. त्यानंतर महिला आरोपीने पीडितेला तिच्या घरी बोलावले. याच ठिकाणी पीडितेने काही महिलांची मॉलीश केली. त्यानंतर मोठ्या हुशानीने महिला आरोपीने पीडितेला तुझे हात अस्वच्छ झाले माझ्याच घरी आंघोळ करून घे असे सांगितले. पीडितेनेही आरोपी महिलेच्या घरीच आंघोळ केली. पण महिला आरोपींने पीडितेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ लपून रेकॉर्ड केला. महिला आरोपी इतक्यावरच थांबली नाही तर तिने हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मी सांगितलेले काम तुला करावे लागेल अशीही तंबीही दिली.
 
 
त्यानंतर महिला आरोपीने पीडितेला शहरातीलच एका हॉटेलमध्ये महिलांची मॉलीश कराची असल्याचे सांगत तिला तेथे नेले. याच ठिकाणी पीडितेजवळ कमल विश्वाणी व विक्रम चावरे नामक दोन व्यक्ती आले. त्यांनी तोच व्हिडीओ पीडितेला दाखविला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विक्रम व कमल या दोघांनी पीडितेचे वेळोवेळी शारिरीक शोषण केले. आरोपींच्या चक्रव्युहतून आपली सुटका करण्यासाठी पीडितेने आपण गर्भवती झाल्याचा बनाव केला. पण त्यानंतरही आरोपींनी पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव आणत तिला मारहाणही केली. शिवाय दोन आरोपींनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अखेर घाबरलेल्या पीडितेला एका खासगी डॉक्टराने आधार दिल्यावर पीडितेने मोठा धाडस करीत रामनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य लक्षात घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून महिला आरोपीसह कमल विश्वाणी याला अटक केली. तर फरार असलेल्या आरोपीचा शोध रामनगर पोलिस घेत आहे.
 
 
अटकेतील आरोपींना पोलिस कोठडी
 
 
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी एक महिला व एक पुरुष आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.