तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
soybean-prices-in-the-open-market : खुल्या बाजारात सोयाबीनचे दर लक्षणीयरीत्या घसरल्याने शेतकèयांनी हमीभावाने विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रांकडे धाव घेतली आहे. विक्री केल्यानंतर तत्काळ चुकारे मिळतील, अशी अपेक्षा शेतकèयांची होती. मात्र वेअरहाऊसची शिट मिळाल्यानंतरच चुकारे अदा केले जाणार असल्याने अनेक शेतकèयांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. परिणामी हमी केंद्रावर विक्री झालेल्या सोयाबीनचे चुकारे मिळण्यासाठी शेतकèयांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात 1 हजार 550 शेतकèयांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी 130 शेतकèयांकडून 2 हजार 140 क्विंटल सोयाबीनची खरेदी हमी दराने करण्यात आली. या खरेदीची एकूण किंमत कोटी 14 लाख 51 हजार 470 रुपये इतक आहे. मात्र आतापर्यंत केवळ 350 क्विंटल सोयाबीनच्या खरेदीचे चुकारे अदा करण्यात आले आहे. उर्वरित रकमेच्या देयकांची प्रक्रिया सुरू आहे. खुल्या बाजारातील व आणि हमीभावातील फरकामुळे शेतकèयांचा कल हमी केंद्रांकडे वाढला आहे. मात्र चूक उशीरा मिळत नसल्याने नाराजी आहे.