तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
women-and-girls-missing : एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना दुसरीकडे मुली बेपत्ता होत आहेत. मागील 11 महिन्यात जिल्ह्यात 1 हजार 230 तरूणींसह महिला तर 609 तरूणांसह पुरुष बेपत्ता झाल्याची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद आहे.
यापैकी 1 हजार 42 तरूणीसह महिला तर 489 तरुणांसह पुरूषांचा तपास लावण्यात पोलिस प्रशासनास यश आले असले तरी जवळपास 188 तरूणींसह 112 तरूणांचे काय झाले, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत पोलिस प्रशासनाच्या नोंदीनुसार 18 वर्षावरील 1 हजार 230 महिला व तरुणी तर 601 तरुणांसह पुरुष बेपत्ता झाल्याची संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये नोंद आहे. यापैकी 1 हजार 42 महिला व 188 पुरुषांचा तपास लावण्यात पोलिस प्रशासनास यश आले असेल तरी जवळपास 188 तरुणी व 112 तरुणांचे काय झाले, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकारामुळे समाजमन कुठेतरी भरकटत असल्याचे दिसून येते. गुन्हा मग तो कुठलाही असो क्षणोक्षणी अनेक घटना घडतच आहे. यावर पायबंद घालण्यात कुठेतरी समाजाची जबाबदारी असतानाही सांभाळल्या जात नसल्याचे दिसून येते. अशाच घटनांबरोबरच परिवाला सोडून पळून जाणे, हरवणे ही जणू समाजाला भविष्यात पोखरणारी किड ठरत आहे. मागील अकरा महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात शेकडो मुलींसह महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे.