पीएम-किसानचा २२ वा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
22nd installment of PM-Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांची २२ वा हप्ता येत्या फेब्रुवारीत जारी होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपये थेट हस्तांतरित केले जातात. नोव्हेंबरमध्ये २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला गेला होता.
 
 
pm
 
२२ वा हप्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अद्याप ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना हप्त्याची रक्कम मिळण्यास विलंब होऊ शकतो. ई-केवायसी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर करून घेतली जाऊ शकते. शिवाय, बँक खाते आधारशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. काही वेळा डीबीटी बंद असल्याने किंवा खाते आधाराशी लिंक नसल्यामुळे निधी हस्तांतरित होत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी आपले खाते आधारशी जोडलेले आहे की नाही आणि डीबीटी सक्रिय आहे का, याची खात्री करणे गरजेचे आहे.
 
तसेच अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास हप्त्याची रक्कम मिळण्यात विलंब होऊ शकतो. नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा जमिनीच्या नोंदींमध्ये चुका असल्यास हप्ता थांबू शकतो. अर्जात काही चूक असल्यास, ती शक्य तितक्या लवकर दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. शेतकरी स्वतःच्या हप्त्याची स्थिती पीएम किसान वेबसाइटवरील ‘लाभार्थी स्थिती’ विभागात जाऊन तपासू शकतात. त्यासाठी आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागतो. यामुळे स्पष्ट होते की हप्ता प्रक्रियेत आहे की काही कारणास्तव अडकला आहे. सरकारच्या अंदाजानुसार, योग्य प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता वेळेत पोहोचेल.