नवी दिल्ली,
300 Indian products exported to Russia रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले आणि या भेटीदरम्यान भारतासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर करार झाले. भारत आणि रशियाचे संबंध अनेक वर्षांपासून मजबूत असून, अमेरिकेकडून भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा दबाव होता. अशा परिस्थितीत पुतिन यांनी सात मंत्र्यांसह भारत भेट देऊन ऊर्जा क्षेत्रातील तसेच इतर महत्वाच्या क्षेत्रांमधील करार पूर्ण केले.
भारताने रशियासाठी अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी आणि रसायनशास्त्र क्षेत्रातील तब्बल ३०० उत्पादनांची यादी तयार केली असून, या वस्तू रशियन बाजारपेठेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संधी भारतासाठी अत्यंत मोठी असून, द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा उद्देश आहे.
पुतिन यांचा भारत दौऱ्यानंतर भारताला रशियामध्ये निर्यात वाढवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यावर रशियाने स्पष्ट केले की, भारताच्या उत्पादनांचे स्वागत मोठ्या प्रमाणात केले जाईल. रशियासोबत झालेल्या करारांमुळे भारत-रशिया संबंध अधिक मजबूत झाले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, रशियाच्या आयातीत भारताचा सध्याचा वाटा अंदाजे २.३ टक्के असून, येत्या काळात ही आयात सातत्याने वाढेल. पुतिन यांच्या दौऱ्यानंतर भारतातील निर्यातदार आता मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहेत.