८ हजार कोटीच्या विम्यामुळे मेसी भारतात सामना खेळला नाही!

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |

नवी दिल्ली,  

8000-crore-insurance-policy-of-messi फुटबॉलचा महान खेळाडू लियोनेल मेसी अलीकडेच भारत दौऱ्यावर आला होता. हा दौरा कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्लीसारख्या शहरांमध्ये सुरु आहे. चाहत्यांना त्याला मैदानात खेळताना पाहण्याची उत्सुकता होती, पण मेसीने कोणताही पूर्ण सामना किंवा प्रदर्शन सामना खेळला नाही.
 
 
8000-crore-insurance-policy-of-messi

याचे मुख्य कारण म्हणजे त्याची महागडी विमा पॉलिसी. मेसी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या शेवटच्या दिवशी ते दिल्लीत जाणार आहेत. तथापि, महान फुटबॉलरने कोणताही अधिकृत सामना खेळला नाही हा दौरा मुख्यतः चाहत्यांशी भेटणे, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आणि काही लहान उपक्रमांमध्ये भाग घेणे यासाठी आयोजित होता. यात मुलांसोबत फुटबॉल क्लिनिक, मीट-एंड-ग्रीट सेशन आणि सेलिब्रिटी इव्हेंट्स यांचा समावेश होता. 8000-crore-insurance-policy-of-messi मात्र, कोणताही अधिकृत क्लब किंवा देशाचा सामना आयोजित केलेला नव्हता मेसीच्या डाव्या पायाची जादूगरी जगभरात प्रसिद्ध आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या डाव्या पायाचे विमा मूल्य सुमारे ९०० मिलियन अमेरिकी डॉलर (सुमारे ८ हजार कोटी भारतीय रुपये) आहे. हा खेळविश्वातील सर्वात महागड्या विमा पॉलिसींपैकी एक आहे.

 

या विमा पॉलिसीमध्ये एक महत्वाची अट आहे की ती फक्त क्लब (इंटर मियामी) किंवा देश (अर्जेंटिना)च्या अधिकृत सामन्यात झालेल्या दुखापतीसाठीच लागू होते. प्रदर्शन किंवा अनौपचारिक सामन्यांचा यात समावेश नाही.  जर मेसी भारतात कोणताही प्रदर्शन सामना खेळले आणि दुखापत झाली, तर विमा कंपनी नुकसानभरपाई देणार नाही. 8000-crore-insurance-policy-of-messi त्यामुळे  त्याला कोट्यवधी डॉलरचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच या दौऱ्यात कोणताही पूर्ण सामना ठेवला गेला नाही. जगातील अनेक मोठ्या खेळाडू त्यांच्या शरीराच्या महत्त्वाच्या भागांचे विमा करतात, पण अटी वेगळ्या असतात. उदाहरणार्थ, बास्केटबॉल लीजेंड मायकेल जॉर्डनच्या करारात एक विशेष कलम होते, ज्यास “लव्ह ऑफ द गेम” म्हणतात यामुळे तो कुठेही, कोणासोबतही खेळू शकतो आणि दुखापत झाली तरी क्लबकडून पगार मिळत राहतो. परंतु, मेसीच्या विमा पॉलिसीमध्ये अशी कोणतीही मुभा नाही, त्यामुळे तो फक्त अधिकृत सामन्यांपुरताच मर्यादित राहतो.