indian white eye भारतीय उपखंडात आढळून येणारा एक छोटासा पक्षी पक्षिजगतात वावरताना दिसतो. तो चिमणीपेक्षाही लहान असून त्याच्या डोळ्यांभोवती पांढरे वर्तुळ असल्यागत दिसून येते; ज्यामुळे तो चष्मा घातल्यासारखा दिसतो आणि त्याचमुळे त्याला नाव पडले चष्मेवाला पक्षी. मुळात कीटकभक्षी असणारा हा पक्षी हिरवट-पिवळ्या रंगात लहान लहान समूहांमध्ये विहार करताना आढळून येतो. ? इंडीयन व्हाईट आय?' अर्थात चष्मेवाला पक्षी भारतात सर्वत्र आढळत असला तरी, झाडांचे प्रदेशांमध्ये अधिकतर प्रमाणात दिसतो. सतत झाडांवर ते मौजेने विहार करताना त्यांचा चिवचिवाट सर्वत्र घुमतो. म्हणून त्यांना वृक्षवासी असेही म्हणतात. पाणी पिण्यासाठी किंवा डबक्यात आंघोळ करण्यासाठीच काय तेवढे ते जमिनीवर उतरलेले दिसतात.
झाडाझुडपांच्या पानांतून खाद्य पकडण्यात नेहमी मग्न असतात. चष्मेवाला पक्ष्यातली मादी आणि नर दोघेही सारखेच दिसतात. ८ ते९ सेंमी लांबीचे चष्मेवालाचा गळा, छातीचा थोडा भाग व बुडावरील पिसे पिवळी तर पोटाचा भाग करडा-पांढरा असतो. शेपटी चौकोनी गडद तपकिरी रंगाची असते. चोच काळी मात्र टोकदार व बाकदार असते. त्याचे वजन अवघे १० ग्रॅम असते. चष्मेवाला पक्ष्याचा आकार व रंगछटांनुसार साधारणतः ११ उपजाती पक्षिजगतात आढळून येतात. चष्मेवाला पक्षी नेहमी थव्याने फिरतात. अवघ्या चार दिवसात ते आपले घरटे बांधून त्यात प्रजननाचा काळ व्यतित करतात. एखाद्या कपासारखे हे घरटे असते. या घरट्यात मादी फिकट निळसर रंगाची दोन ते तीन अंडी घालते. घरटे बांधण्यासाठी नर-मादी दोघेही मेहनत घेतात. कीटकभक्षी पक्षी सलता तरी चष्मेवाला पक्षी फुलांचा रस आणि फळे आवडीने चाखतात. अधूनमधून? चीर्रऽऽ चीर्रss?' अशी मंजूळ शीळ घालत फुलांमधील मधुरस घेतात. आकाराने लहान असत्यामुळे त्यांचा सामूहिक बचावात्मकतेचा पवित्रा असतो. वटवाघूळ, खंड्या हे पक्षी त्याचे शत्रू आहेत. चष्मेवाला पक्ष्याची विशेषता ही आहे की, ते इतर पक्ष्यांच्या घरट्यातील सामान चोरून आणतात व इतर जातीच्या पक्ष्यांच्या पिलांना अन्न भवतात. साधारणपणे १० वर्षेपर्यंत हे पक्षी जगू शकतात.indian white eye डोळ्यांभोवतीच्या पांढत्या वलयाने ओळखले जाणारे चष्मेवाला पक्ष्याचे विविध उपप्रकार विविध वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम झाले असून गोलाकार पंखांमुळे चपळतेने उडण्यास त्यांना मदत होते व वाकदार चोचीने कीटकांवर हल्ला करण्यास सोयीचे होते. चष्मेवाला पक्ष्याच्या गोड आवाजाचे सर्वत्र कौतुकच होते. त्यांच्या वास्तव्यामुळे बाग-बगीच्यांना नैसर्गिक आकर्षकता मिळते आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होते. कीटकभक्ष्यी असल्याने याला शेतकऱ्यांचा मित्रही म्हणतात. तथापि, जंगलतोड आणि शहरीकरणामुळे त्याच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.