अभिनेता-दिग्दर्शक रॉब रेनर आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू; घरात आढळले मृतदेह

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली, 
actor-director-rob-reiner-and-wife-died हॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता  आणि दिग्दर्शक रॉब रेनर आणि त्याची पत्नी मिशेल सिंगर हे रविवारी दुपारी त्यांच्या ब्रेंटवुड येथील घरात मृतावस्थेत आढळले. या घटनेने केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरातील चित्रपट उद्योगाला धक्का बसला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतांवर चाकूने जखमा आढळल्या आहेत, ज्यामुळे हा खून झाल्याचे दिसून येते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
actor-director-rob-reiner-and-wife-died
 
पोलिस आणि स्थानिक सूत्रांनुसार, रविवारी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास चॅडबॉर्न अव्हेन्यू येथील घरातुन आपत्कालीन कॉल आला. लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाचे पॅरामेडिक्स घटनास्थळी पोहोचले. आत पोहोचताच त्यांना ७८ वर्षीय पुरूष आणि ६८ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. लॉस एंजेलिस पोलिस विभागाला तात्काळ कळवण्यात आले. प्राथमिक तपासात दोघांचा मृत्यू चाकूने झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घरातून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. तथापि, हल्ला कधी झाला किंवा घटनेच्या वेळी आणखी कोण उपस्थित होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. actor-director-rob-reiner-and-wife-died पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूची वेळ आणि पद्धती याबद्दल संपूर्ण माहिती उघड होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात पोलिस रॉब रेनरचा मुलगा निक याची चौकशी करत आहेत. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की कुटुंबातील एखाद्या सदस्याचा या हत्येत सहभाग असू शकतो. तथापि, पोलिसांनी अद्याप या दाव्याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. actor-director-rob-reiner-and-wife-died रॉब रेनर हा प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि चित्रपट निर्माते कार्ल रेनरचा मुलगा होता. त्याने जवळजवळ पाच दशके हॉलिवूडमध्ये अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून काम केले. ऑल इन द फॅमिली या टीव्ही मालिकेत मायकेल मीटहेड स्टिव्हिकच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम ओळख मिळाली. या भूमिकेसाठी त्याला दोन एमी पुरस्कार देखील मिळाले.