भंडारा,
all india radio भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील आदर्श गाव गट ग्रामपंचायत खैरी वलमाझरी येथे विविध ठिकाणच्या आकाशवाणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये ग्रामविकास, लोकसहभाग, शासनाच्या विविध योजना, ग्रामीण संस्कृती व विकासात्मक उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी भैय्यालाल टेकाम, कार्यक्रम प्रमुख व केंद्र प्रमुख आकाशवाणी अमरावती, विजय राजपूत, सहाय्यक केंद्र संचालक, आकाशवाणी नागपूर, सचिन लाडोळे, कार्यक्रम अधिकारी, नागपूर, सतीश रेवे, कार्यक्रम अधिकारी, नागपूर, सदानंद कामडी, कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी परभणी तसेच मनोहर पौणीकर, माजी सहाय्यक केंद्र संचालक, मुंबई यांची उपस्थिती होती. यावेळी आदर्श गाव संकल्पनेअंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे यांच्या वतीने या अधिकाऱ्यांना देण्यात आली.all india radio स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, लोकसहभागातून विकास, महिला व युवकांचा सहभाग, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील सकारात्मक उपक्रमांना आकाशवाणीच्या माध्यमातून व्यापक प्रसार देण्याबाबतही चर्चा झाली.या भेटीमुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासात्मक कार्यांना निश्चितच नवी दिशा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.