नवी दिल्ली,
Ayush Mhatre and Vaibhav Suryavanshi अंडर-१९ आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाने सेमीफायनलसाठी आपले स्थान पक्के केले आहे. ग्रुप A मधील रविवारी झालेल्या सामन्यात युष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशीच्या दमदार प्रदर्शनामुळे भारताने पाकिस्तानला ९० धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने ग्रुप A मध्ये अव्वल स्थान मिळवले आणि सेमीफायनलमधील आपली जागा सुनिश्चित केली.
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने स्पर्धेची जोरदार सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यात युएईला २३४ धावांनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर ९० धावांनी विजय मिळवला. रविवारी युएईने मलेशियावर ७८ धावांनी विजय मिळवला. या निकालानंतर भारताची सेमीफायनलमधील जागा अधिकृत झाली, तर मलेशिया सलग पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
पाकिस्तानाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आपला शेवटचा सामना यूएईविरुद्ध जिंकणे आवश्यक आहे. पाकिस्तानने मलेशियावर मिळवलेल्या २९७ धावांच्या विजयामुळे त्याचा नेट रनरेट +४ पेक्षा जास्त झाला आहे, जो भारताकडून पराभव झाल्यानंतरही +२.०७० आहे. याउलट, यूएईचा नेट रनरेट -१.६०८ आहे. त्यामुळे पाकिस्तानला फक्त यूएईवर विजय मिळवणे आवश्यक आहे. ग्रुप B मध्ये श्रीलंका पहिल्या तर बांग्लादेश दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान आणि नेपाळ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. ग्रुप स्टेजनंतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.