चंद्रपूर,
cmc-chandrapur-commissioner चंद्रपूर महानगरपालिकेत पहिल्यांदाच आयएएस अधिकारी अकनुरी नरेश यांची आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर सोमवारला सकाळी त्यांनी मनपातील ‘लेट लतिफ’ अधिकारी व कर्मचार्यांना चांगलाच दणका दिला. आयुक्तांनी महानगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश देत कार्यालयात उशिरा पोहचणार्यांना अधिकारी व कर्मचार्यांना प्रवेशद्वारावरच ताटकळत ठेवले. सकाळी 10 वाजताच्या अधिकृत कार्यालयीन वेळेत आयुक्त अकनुरी नरेश महानगरपालिकेत दाखल झाले.
(बंद प्रवेशद्वाराजवळ ताटकळत असलेले अधिकारी व कर्मचारी)
cmc-chandrapur-commissioner मात्र, बहुतांश अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संतप्त झालेल्या आयुक्तांनी थेट महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले. काही वेळाने अधिकारी व कर्मचारी कार्यालयात पोहोचले असता त्यांना प्रवेशद्वार बंद असल्याचे आढळून आले. या कृतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचार्यांची मोठी गर्दी जमली होती. आयुक्त अकनुरी नरेश यांनी दिलेल्या या धक्क्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकार्यांमध्ये एकच खळबळ उडाली. काही वेळाने या ‘लेट लतिफांचा क्लास’ घेतल्यावर सर्वांच्या नोंदी घेत त्यांना रुजू करून घेण्यात आले.