नवी दिल्ली,
Cold wave across India उत्तर भारतात थंडीची लाट वाढली असून हवामान खात्याने अनेक राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्याचे सावट पसरले, ज्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना अडचणी निर्माण झाल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश, ईशान्य मध्य प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरू आहे आणि ती येत्या काही दिवसांत वाढू शकते.
१५ आणि १६ डिसेंबरला तेलंगणा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर कर्नाटकमध्ये तीव्र थंडीची लाट अनुभवायला मिळेल. हवामान खात्याने नागरिकांना उबदार कपडे घालण्याचा, घरे उबदार ठेवण्याचा आणि कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे आणि पशुधनाचे दंवापासून संरक्षण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
धुक्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. १५ आणि १६ डिसेंबरला उत्तर प्रदेशच्या विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. विशेषतः १५ डिसेंबरला अत्यंत दाट धुके राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, १५ आणि १९ डिसेंबरला ईशान्य भारतातील काही भागात, १५ आणि १७ डिसेंबरला हिमाचल प्रदेशात, तसेच १५ आणि १६ डिसेंबरला पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि ईशान्य मध्य प्रदेशात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.