दीपिका पादुकोणच्या ‘स्पिरिट’ वादानंतर पुन्हा चर्चेला उधाण!

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Ranveer Singh viral video काही महिन्यांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत कामाच्या वेळेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आठ तासांपेक्षा जास्त शूटिंग न करण्याच्या मुद्द्यावरून अभिनेत्री दीपिका पादुकोण चर्चेत आल्या होत्या. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या प्रभास स्टारर ‘स्पिरिट’ या चित्रपटात काम करत असताना दीपिकाने आठ तासांपेक्षा जास्त शूटिंग न करण्याची अट घातल्याने अखेर तिला चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा रंगली होती. या प्रकरणावर अनेक कलाकारांनी आपापली मते मांडली होती. काहींनी दीपिकाच्या भूमिकेचे समर्थन केले, तर काहींनी या मागणीला अव्यवहार्य ठरवले.
 

Ranveer Singh viral video  
या पार्श्वभूमीवर आता अभिनेता रणवीर सिंगचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दीपिकाच्या वादाच्या बराच आधीचा असून, एका मुलाखतीदरम्यान रणवीरला आठ तासांच्या शिफ्टबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी रणवीर म्हणाला होता की, अनेक कलाकार आणि त्यांचे मॅनेजमेंट त्याच्यावर नाराजी व्यक्त करतात. “तू सगळ्यांना बिघडवत आहेस,” असे मला म्हटले जाते. कारण आठ तासांच्या शिफ्टमध्ये मी अनेकदा दहा ते बारा तास शूटिंग करतो आणि त्यामुळे इतरांनाही तसेच करावे लागते, असे त्याने स्पष्ट केले होते.
 
 
 
रणवीर पुढे Ranveer Singh viral video  असेही म्हणाला होता की, आठ तासांत अपेक्षित काम पूर्ण होत नसेल, तर थोडे अधिक शूटिंग करायला हरकत नाही. तो कामाकडे केवळ देण्या-घेण्याच्या व्यवहारासारखे पाहत नाही, असेही त्याने स्पष्ट केले होते. रणवीरच्या या विधानामुळे कामाच्या वेळेबाबत त्याची भूमिका नेहमीच लवचिक राहिल्याचे दिसून येते.
 
 
दरम्यान, रणवीर सिंग Ranveer Singh viral video  सध्या आपल्या आगामी ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, ‘धुरंधर’साठी संपूर्ण टीमने सुमारे दीड वर्षे सलग 16 ते 18 तास काम केले आणि कुणीही कामाच्या तासांबाबत तक्रार केली नाही. रणवीर सिंगसह सर्व कलाकारांनी शंभर टक्के मेहनत घेतल्याचे आदित्य धर यांनी नमूद केले होते.आता दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या शिफ्टवरील वादानंतर रणवीर सिंगचे हे जुने विधान आणि आदित्य धर यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर या मुद्द्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, चित्रपटसृष्टीतील कामाच्या वेळा, कलाकारांचे हक्क आणि कामाची संस्कृती यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.