धानोर्‍यातील पशुदवाखाना कुलूपबंद

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
धानोरा,
Dhanora Veterinary Hospital, येथील पशुवैद्यकीय दवाखाना अनेकदा अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे कुलूपबंद आढळून येत असल्याने पशुपालकांची मोठी अडचण होत आहे. उपचारासाठी दूरवरून जनावरे घेऊन येणार्‍या पशुपालकांना निराश होऊन परत जावे लागत असून, या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकार्‍यांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी भाजपचे जिल्हा सचिव सारंग साळवे यांनी केली आहे.
 

Dhanora Veterinary Hospital, 
शासनाने धानोरा Dhanora Veterinary Hospital, येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी सुसज्ज नवीन इमारत उपलब्ध करून दिली आहे. या दवाखान्यात सहायक पशु संवर्धन आयुक्त व सहायक पशुधन विकास अधिकारी असे दोन अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, परिचर व इतर आवश्यक पदे अद्याप रिक्त आहेत. या दवाखान्याशी धानोरा परिसरातील तब्बल 28 गावे जोडलेली असून, पशुधनाची संख्या मोठी आहे. त्यामुळे या दवाखान्यावरची जबाबदारीही अधिक आहे. असे असतानाही पशुपालक आजारी जनावरांना उपचारासाठी घेऊन दवाखान्यात आले असता अनेकदा अधिकारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून येते. दोन अधिकारी कार्यरत असताना एक अधिकारी बाहेरगावी गेल्यास दुसर्‍या अधिकार्‍याने दवाखान्यात उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण होत असल्याचे पशुपालकांकडून सांगण्यात येत आहे.
नगरपंचायततर्फे भटक्या कुत्र्यांचे लसीकरण सुरू आहे. तसेच पशुंच्या उपचारासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने काही वेळ दुपारनंतर दवाखाना बंद करून जावे लागते. इतर वेळी मी रुग्णालयात नियमित हजर असतो. मनोज कुडमेथे, सहायक पशुधन विकास अधिकारी, धानोरा.