राम मंदिर चळवळीतील प्रमुख डॉ. रामविलास वेदांती यांचे निधन

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
रेवा,
Dr. Ramvilas Vedanti has passed away राम मंदिर चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व डॉ. रामविलास वेदांती यांचे निधन झाले आहे. मध्य प्रदेशातील रेवा येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. वेदांती हे श्री राम जन्मभूमी चळवळीचे प्रमुख शिल्पकार आणि अयोध्येचे माजी खासदार होते. त्यांना राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य म्हणूनही ओळखले जात होते.
 
 
 
डॉ. रामविलास वेदांती
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, श्री रामजन्मभूमी चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ, माजी खासदार आणि अयोध्या धाम येथील वशिष्ठ आश्रमाचे आसंत डॉ. रामविलास वेदांती यांचे निधन हे आध्यात्मिक जगताचे आणि सनातन संस्कृतीचे अपूरणीय नुकसान आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली! त्यांचे निधन एका युगाचा अंत आहे. धर्म, समाज आणि राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे.
 
रामजन्मभूमी चळवळीतील प्रमुख व्यक्तींपैकी असलेले डॉ. वेदांती अयोध्येतील खासदार असताना संसदेपासून रस्त्यांपर्यंत राम मंदिराच्या बांधकामाला पाठिंबा दिला. त्यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडे मागणी केली होती की अयोध्येतील मुस्लिम नावे असलेल्या रस्त्यांची नावे बदलून राम आणि त्यांच्या पूर्वजांचे नाव ठेवावे.