जसप्रीत बुमराहने मैदान सोडून गाठले घर!

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Jasprit Bumrah has reached home टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सात विकेट्सने विजय मिळवला, मात्र या सामन्यात स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळताना दिसला नाही. मालिकेतील पहिले दोन सामने खेळलेला बुमराह अचानक प्लेइंग इलेव्हनमधून काढला गेल्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. बीसीसीआयने अधिकृत निवेदन जारी करत स्पष्ट केले की बुमराह वैयक्तिक कारणांमुळे घरी परतला असून, त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध नव्हता. बुमराह उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार की नाही, याबाबत अद्याप अंतिम माहिती दिलेली नाही. त्याचप्रमाणे, अक्षर पटेलही आजारपणामुळे या सामन्यात उपलब्ध नव्हता.

jasprit bumrah
 
 
नाणेफेकीवेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, बुमराह वैयक्तिक कारणांमुळे घरी परतला आणि त्यामुळे तो सामन्यात खेळू शकला नाही. बीसीसीआयनेही या माहितीची पुष्टी केली असून, चाहत्यांचे लक्ष पुढील अपडेटवर लागले आहे. सामन्याबद्दल सांगायचं झालं, तर भारताने दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 177 धावांवर गुंडाळले. नंतर भारताने 15.5 षटकांत 120 धावांवर तीन विकेट्स गमावत सामना जिंकला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. अभिषेक शर्माने 18 चेंडूत 35 धावा करून टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. शुभमन गिल आणि अभिषेकने पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या.
 
कर्णधार सूर्यकुमार यादवने 12 धावा केल्या, तर तिलक वर्मा आणि शिवम दुबेनं विजयाची पाहणी केली. तिलकने 34 चेंडूत 25 धावा केल्या आणि शिवमने 4 चेंडूत 10 धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जानसेन आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या विजयामुळे भारताने मालिकेत वरिष्ठ स्थान टिकवले असून, बुमराहच्या पुढील सामन्यांसाठी उपलब्धतेबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.