वाशीम,
Kidnapping Case लग्नाच्या नावाखाली वर मुलगा व वडिलाची फसवणूक करुन त्यांचे अपहरण करणार्या व लुटमार करणार्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, यामध्ये लुटेरी नवरीसह एजंट व तिला सहकार्य करणारे अशा पाच आरोपींना वाशीम पोलिसांनी विविध ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. वरील दोन्ही प्रकरणात एकूण १३ आरोपी असून, आणखी आरोपी वाढण्याची शयता असल्याची माहिती जिपोअ अनुज तारे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
याबबात सविस्तर असे की, रिसोड येथील मोप गावाजवळ एका स्वीप्ट डिझायरमधील इसमांना त्या मार्गावरुन जाणार्या तिन ते चार वाहनामधील टोळयांनी जबर मारहाण करुन २२ हजार रुपये घेवून घटनास्थळावरुन पसार झाले. याबाबत माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे घटनास्थळी दाखल झाले. याबाबत गुप्तदाराकडून माहिती घेत असतांना पोलिसांना माहिती मिळाली की, १० डिसेंबर रोजी आसेगाव पेन जि. वाशीम येथील दिपक सिताराम खानझोडे यांचा विवाह राधा तुपे रा. संभाजी नगर हिचे सोबत आसेगाव येथे पार पडला. मुलीसोबत लग्न लावण्यासाठी मध्यस्थामार्फत दोन लाख रुपये दिले. लग्नानंतर वधू पळून जाण्याच्या बेतात असल्याचे खानझोडे परिवाराला समजले. त्यामुळे त्यांनी सदर मुलीवर पाळत ठेवली. १३ डिसेंबर रोजी अज्ञात चारचाकी वाहनामधुन १० ते १२ लोक आसेगाव पेन येथे आले असता त्यांना मुलगी दिली नाही. त्यामुळे त्यांनी खानझोडे यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली व वर पिता सिताराम यांचे अपहरण करुन पसार झाले. मुलगी द्या आणि वर पित्याला घेऊ जा अशी धमकी दिली. त्यानंतर ते मोहजा येथून जालनाकडे निघाले, अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी वेगवेगळे पथके तयार करुन जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर येथे तपासकामी रवाना केले. सिताराम खानझोडे यांची सिताफीने अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुटक केली. दरोडा टाकून अपहरण करणारे आरोपी राहुल दिलीप मस्के रा. नागेवाडी जि. जालना व सतिष विनायक जाधव रा. जालना यास अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश छगन गायकवाड यास जालना येथून ताब्यात घेतले. तसेच नवरी मुलगी व एजंट शांताराम कडुजी खराटे रा. मोहजा रोड यास ताब्यात घेतले. याप्रकरणी रिसोड पोलिस स्टेशन येथे विविध कलमान्वये दरोडा व फसवणूक प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई Kidnapping Case जिपोअ अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोनि रामेश्वर अवचार, सपोनि जगदीश बांगर, योगेश धोत्रे, पोलिस अंमलदार गजानन झगरे, गजानन गोटे, दीपक घुगे, अमोल इरतकर, संदीप दुतोंडे, तसेच चालक सुनील तायडे व सोयबर सेलचे पोअम किशोर इंगोले, मपोअमं प्रतिक्षा एकाडे यांच्या पथकाने केली.