ममता बॅनर्जींची तुलना हिटलरशी!

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक हाय-व्होल्टेज ड्रामा

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
कोलकाता,
Mamata Banerjee is compared to Hitler. पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर थेट हल्ला चढवला आहे. बिहारचे मंत्री नितीन नबीन नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यानंतर भाजपने ममता बॅनर्जींची तुलना जर्मन हुकूमशहा हिटलरशी केली आहे. भाजपने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की दोघेही एकसारखे आहेत आणि हुकूमशहा घाबरला आहे! असेही त्यांनी नमूद केले आहे. राज्यातील निवडणूक आयोगाने एसआयआर नंतर मसुदा मतदार यादी जाहीर करायची असून, आयोगाने बिहारपेक्षा बंगालमध्ये जास्त मतदार वगळले आहेत. एकूण ५८ लाख मतदार वगळण्यात आले असून, ममता बॅनर्जी यांच्या स्वतःच्या भवानीपूर मतदारसंघातील ४०,००० हून अधिक मते यादीतून वगळली गेली आहेत.
 
 

mamata 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका फक्त दोन ते तीन महिन्यांवर असून, मार्च-एप्रिलमध्ये होण्याची अपेक्षा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने ७७ जागा जिंकल्या, परंतु आताच्या सध्याच्या स्थितीनुसार भाजपचे आमदार ६३ आहेत, कारण अनेक आमदार पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतले आहेत. भाजपच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना निशाणा बनवण्यात आला असून, त्यांची तुलना हिटलरशी केली आहे. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वात प्रमुख नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत आहेत. बंगालमध्ये विजयाची हॅटट्रिक गाठलेल्या तृणमूल काँग्रेसने डाव्या पक्षांकडून सत्ता मिळवली आहे. बिहारमधील भाजपच्या यशानंतर आता बंगालबाबत पक्षाचे उद्दिष्ट स्पष्ट झाले आहे, तर दिल्लीतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालला वेगळे लक्ष्य असल्याचेही सांगितले.