नागपूर,
Nagpur news आज ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग लाभार्थींना आर्थिक सहाय्य वितरण कार्यक्रम पार पडला. ग्राम पंचायतने ५ टक्के निधीतून प्रत्येकी ३०,००० रुपये आर्थिक सहाय्य प्रदान केले. हा कार्यक्रम सरपंच प्रीति इंगळे यांच्या हस्ते पार पडला. लाभार्थींना धनादेश देऊन मदतीचे वितरण केले गेले. यामुळे दिव्यांग लाभार्थींना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास तसेच स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकण्यास मदत होईल.
कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी तसेच लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच इंगळे यांनी ग्रामपंचायत दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. Nagpur news लाभार्थींनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले व भविष्यात अशा कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र