नागपूरचा जलतरणपटू भार्गव मोकद्दम चमकला

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Nagpur swimmer मालवण सिंधुदुर्ग जलतरण संघटनेतर्फे आयोजित १५ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा–२०२५ उत्साहात पार पडली. या स्पर्धेत देशातील ८ राज्यांमधील १५०० हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत रामटेक सृष्टी सौंदर्य परिवाराचे पाच जलतरणपटू सहभागी झाले होते. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील एकमेव खेळाडू भार्गव वेदप्रकाश मोकद्दम (वयोगट ११–१२) यांनी १० कि.मी. सागरी जलतरण अवघ्या २ तास २३ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच दुसऱ्या दिवशी झालेल्या २ कि.मी. सागरी जलतरण स्पर्धेत १२५ स्पर्धकांतून त्यांनी ७ वे स्थान पटकावले.
 
Nagpur swimmer
 
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भार्गव यांना रोख बक्षीस, पदक, प्रमाणपत्र तसेच आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. भार्गवच्या या यशामागे त्यांचे वडील वेदप्रकाश मोकद्दम यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सरावासाठी दिलेली साथ व प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे. याशिवाय प्रथमेश किंमतकर यांनी ५ कि.मी. सागरी जलतरण १ तास ४६ मिनिटांत पूर्ण केले. Nagpur swimmer तसेच अभंग किंमतकर, ऋषिकेश किंमतकर व देविदास साखरे यांनी ३ कि.मी. सागरी जलतरण यशस्वीरीत्या पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली. सर्व सहभागी जलतरणपटूंना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रामटेक सृष्टी सौंदर्य परिवाराच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौजन्य: सारंग पांडे, संपर्क मित्र