बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न

pulgaon-atm-theft-cctv हिंगणघाटातही चोर्‍यांचे सत्र सुरूच

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
पुलगाव, 
 
 
pulgaon-atm-theft-cctv स्टेशन चौक परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये नोटा ठेऊन असलेल्या लॉकरचे दार उघडे आढळल्याने आज सकाळी परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी काही नागरिकांना एटीएम मशीनचे बाहेरील दार उघडे दिसले. कर्मचार्‍याच्या हाताने उघडे राहिले हे स्पष्ट सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेल या कारणांमुळे तातडीने बँक कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्यात आला. बँक कर्मचार्‍यांनी फुटेज वर्धा ऑफिसकडे राहत असल्याचे सांगितले. pulgaon-atm-theft-cctv एटीएमचे दार उघडे असले तरी आतील मशीन सुरक्षित असल्याचे आणि कोणतीही रोकड चोरीस गेलेली नाही असे स्पष्ट झाले. बँक कर्मचार्‍यांनी या घटनेची तोंडी माहिती पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात विचारणा केली असता स्टेशन डायरीत तशी कोणतीही लेखी तक्रार किंवा नोंद नाही, असे सांगण्यात आले. चोरीचा प्रयत्न झाला असल्यास ऑनलाईन तक्रार सायबर सेलकडे केली जाऊ शकते, असेही पोलिसांनी सांगितले.
 
 
 
pulgaon-atm-theft-cctv
हिंगणघाटात चोर्‍यांचे सत्र सुरूच; दुसर्‍याही दिवशी हात सफाई
शहरात चोर्‍यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी सकाळी चोर्‍यांची चर्चा शहरात सुरू असताना चोरट्यांनी पुन्हा त्याच दिवशी रात्री २ ठिकाणी घरफोड्या केल्या. शहरातील नंदोरी मार्गावरील भाकरा नाल्याजवळ असलेल्या तारावंती इंडेन गॅस एजन्सीचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. एजन्सीतील आलमारीत ठेवलेली तब्बल ३ लाख ६१ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी गॅस एजन्सीचे संचालक सुभाष खत्री यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.
 
 
रविवार असल्याने एजन्सी बंद होती, मात्र सोमवारी सकाळी उघडण्यासाठी गेले असता शटर वाकलेले आणि आत चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, चोरट्यांनी शहराच्या सेंट्रल वार्डमधील लक्ष्मी माता मंदिरालाही लक्ष्य केले असून मंदिरातील दानपेटी व घंटा चोरून नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धार्मिक स्थळही सुरक्षित नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत शहरातील प्रमुख व्यापारी बाजारात तब्बल आठ दुकानांवर चोरीचा प्रयत्न झाल्याने भीतीचे वातावरण आहे. सलग घडत असलेल्या या धाडसी चोर्‍यांमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्यानेच रुजू झालेल्या ठाणेदारांचे कार्यकाळात चोर्‍यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.