नागपूर,
Navin Narsala area नविन नरसाळा भागातील पोहरा नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी शासकीय STP प्लांट सुरू करण्यात आले आहे. तथापि, नदीचे पाणी थोपवून प्रक्रिया केल्यामुळे साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी निर्माण होत आहे, ज्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. STP प्लांटमधील कर्मचारी बांधावरील दरवाजे सतत बंद ठेवतात, परिणामी नदीच्या पश्चिमेकडील भागात पाण्याची पातळी वाढते आणि दुर्गंधी पसरते.
या परिस्थितीमुळे डासांद्वारे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मनपा वेळोवेळी नागरिकांच्या तोंडी व लेखी तक्रारींवर दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. Navin Narsala area सामाजिक कार्यकर्ते विशाल कोरके आणि परिसरातील नागरिकांनी यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सौजन्य: महेंद्र वैद्य, संपर्क मित्र