सातारा,
satara MD drugs factory सातारा येथे एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणाहून सात आरोपींना अटक केली आहे. भाईंदर आणि आसाम येथील रहिवासी असलेल्या कुी विला चेरियाण, कायम सय्यद ऊर्फ सद्दाम, राजीकुल रेहमान आणि हाविजुल इस्लाम यासह सलीम शेख, रईस शेख आणि विशाल मोरे या आरोपींना अटक करण्यात आली. रविवारी या सर्वांना किल्ला न्यायालयात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
गुन्हे शाखेच्या चौकशीत उघडकीस आले की, सलीम शेख आणि रईस शेख हे दोघे विक्रोळीचे रहिवासी असून त्यांच्याकडून 136 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांच्यामुळे विशाल मोरे याचे नाव समोर आले आणि त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. विशाल मोरे सातारा येथून एमडी ड्रग्ज आणून, त्याच्या सहकार्यांच्या मदतीने मुंबईसह इतर शहरात विक्री करत होता.
सातारा येथील satara MD drugs factory जावळी व बामनोली येथील सावरीगावात एका शेतातील प्लास्टिक नसलेल्या विटांच्या शेडमध्ये एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकून साडेसात किलो एमडी ड्रग्ज, 38 किलो एमडीचे लिक्विड आणि इतर कच्चा माल असा सुमारे 115 कोटींच्या मुद्देमाल जप्त केला आहे.चौकशीत समोर आले की, या शेतजमिनीचा मालक गोविंद बाबाजी सिंदकर असून, त्यांनी ही जागा ओमकार तुकाराम दिघे यांच्या माध्यमातून सद्दाम नजर अब्बास सय्यद यांना भाडेतत्त्वावर दिली होती. या जागेवर एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु करण्यात आला आणि तयार झालेले ड्रग्ज मुंबईसह इतर शहरात तसेच राज्यात विक्रीसाठी पाठवले जात होते.गुन्ह्याच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, एमडी ड्रग्जची ही आंतरराज्य टोळी होती. टोळीतील इतर काही आरोपींची नावेही समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलीस विशेष मोहीम राबवत आहेत. पोलीस या टोळीच्या मुख्य्याचा शोध घेत आहेत, तसेच त्याचा राजकीय पक्षांशी संबंध आहे का, कारखान्यात किती किलो एमडी तयार झाली, कोणत्या पेडलरच्या माध्यमातून कोणत्या शहरात विक्री झाली, याचा तपास चालू आहे.सातारा पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणात सतत कारवाई करत असून, एमडी ड्रग्जच्या आंतरराज्यावरील नेटवर्कचा फटका बसवण्याचा प्रयत्न सुरु आहे.