नवी दिल्ली,
shaheen-shah-afridi पाकिस्तान आधीच जगभरात कुप्रसिद्ध आहे. त्यांचे क्रिकेटपटू कुठेही गेले तरी त्यांच्या देशाची बदनामी करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत. आता, पाकिस्तान क्रिकेट संघाचा एकदिवसीय कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीचा प्रचंड अपमान झाला आहे. त्याला षटकाच्या मध्यभागी गोलंदाजी करण्यापासून रोखण्यात आले. पंचाने गोलंदाजाला षटकाच्या मध्यभागी गोलंदाजी करण्यापासून रोखल्याची ही एक अनोखी घटना आहे. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे.
ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगला सुरुवात झाली असून सोमवारी मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात दुसरा सामना खेळवला गेला. shaheen-shah-afridi या सामन्यात ब्रिस्बेन हीटने प्रथम फलंदाजी केली. त्यावेळी गोलंदाजीची जबाबदारी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र सुरुवातीलाच शाहीन महागडे ठरले. पहिल्या दोन षटकांत त्यांनी तब्बल 28 धावा दिल्या. तिसरे षटक टाकण्यासाठी आल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. त्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार बसला, दुसऱ्या चेंडूवर एक धाव निघाली. तिसरा चेंडू नो-बॉल ठरला आणि तो थेट बीमर होता. पुढे त्याच षटकातील पाचव्या चेंडूवरही शाहीनकडून बीमर नो-बॉल टाकण्यात आला. क्रिकेटमध्ये बीमरला फलंदाजावर जाणूनबुजून हल्ला मानले जाते आणि ते अजिबात सहन केले जात नाही.

एका षटकात दोन बीमर टाकल्यास पंचांना गोलंदाजाला तात्काळ गोलंदाजीपासून रोखण्याचा अधिकार असतो. पंचांनी नियमांनुसार कारवाई करत शाहीन आफ्रिदीची गोलंदाजी थांबवली. त्यामुळे तो तिसऱ्या षटकात केवळ चारच चेंडू टाकू शकले. उरलेले दोन चेंडू दुसऱ्या गोलंदाजाने टाकत ते षटक पूर्ण केले. shaheen-shah-afridi बीमरमुळे एखाद्या गोलंदाजाला मधल्या षटकातच थांबवण्याची घटना फार क्वचितच पाहायला मिळते, मात्र शाहीन आफ्रिदीच्या या प्रकारामुळे पाकिस्तान क्रिकेटचीही नामुष्की झाली. शाहीन आफ्रिदीनी 2.4 षटकांत 43 धावा दिल्या आणि त्यांना एकही विकेट मिळवता आली नाही. त्याचा इकॉनॉमी रेट तब्बल 16.10 इतका होता. वेळेत त्यांना गोलंदाजीपासून रोखले नसते, तर उरलेल्या चेंडूंवर आणखी किती धावा दिल्या असत्या, याचा अंदाजही लावणे कठीण आहे. अखेर मेलबर्न रेनेगेड्सने 20 षटकांत पाच गडी गमावून 212 धावांचा मोठा स्कोअर उभारला.