एआय तंत्रज्ञान, ड्राेन आणि सीसीटीव्हीमुळे यशस्वी बंदाेबस्त

- पाेलिस अधीक्षक डाॅ. निलेश पांडे

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nilesh pandey गेल्या सात दिवसांत राज्यभरातून माेर्चे उपराजधानीतील विधानभवनावर धडकले. माेर्चात हजाराे पुरुष-महिलांचा समावेश हाेता. त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पाेलिसांनी डाेळ्यात तेल ओतून यशस्वी बंदाेबस्त सांभाळला. याचे श्रेय एआय तंत्रप्रणाली, ड्राेन आणि सीसीटीव्हीसह हजाराे कर्मचाऱ्यांना जाते, अशी प्रतिक्रिया माेर्चास्थळावरील बंदाेबस्त सांभाळणारे पाेलिस अधीक्षक डाॅ. निलेश पांडे यांनी दिली.
 
 

निलेश पांडे  
 
 
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातील पाेलिस अधिकारी आणि कर्मचारी उपराजधानीत दाखल हाेतात. अधिवेशन काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात येताे. विधानभवनानंतर सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणचे माेर्चा स्थळ हाेेय. कारण राज्यभरातील काना-काेपऱ्यातून हजाराे माेर्चेकरी या ठिकाणी येतात. शासनाने मागण्या मान्य कराव्या, यासाठी माेर्चेकरी आक्रमक हाेतात. त्यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पाेलिस सजग असतात. माेर्चास्थळाच्या बंदाेबस्तासाठी जबाबदारी यावर्षी पाेलिस अधीक्षक डाॅ. निलेश पांडे यांच्याकडे हाेती. यावेळी माेर्चातील गर्दीवर वाॅच आणि नियंत्रण ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. माॅरेस काॅलेज चाैकात मिनी कंट्राेल रुम तयार करण्यात आली हाेती. यामध्ये सीसीटीव्हीचे फुटेज बघून वाॅच ठेवण्यात येत हाेता. लॅपटाॅपचा वापर करुन गर्दीवर नियंत्रण आणि संख्या लक्षात घेण्यासाठी ड्राेन कॅमेऱ्यांचा वापर यावर्षी करण्यात आला हाेता. तसेच माेर्चा परिसरातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. तंत्रप्रणालीचा सुयाेग्य वापर केल्यामुळेच यावर्षी माेर्चात काेणतीही तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली नाही.
वैध मागण्या घेऊन विधानभवनावर हजाराे माेर्चेकरी धडकतात. कायद्याच्या चाैकटीत राहून त्यांच्या मागण्यांचे निवेदन संबंधित मंत्र्यां पर्यंत पाेहचविण्यात येते. त्या सर्वांची सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर असते.nilesh pandey पाेलिस आयुक्त डाॅ. सिंगल यांच्या मार्गदर्शनात आम्ही माेर्चास्थळावरील बंदाेबस्त यशस्वी केला. त्यासाठी सीसीटीव्ही, एआय तंत्रज्ञान आणि ड्राेनचा वापर केला. बंदाेबस्ताच्या यशाचे संपूर्ण श्रेय राज्यभरातून आलेल्या प्रत्येक पुरुष व महिला पाेलिस अंमलदारांना जाते.
- डाॅ. निलेश पांडे