श्रीराम कथेत न्हाऊन निघाले साहुली गाव!

श्रीराम चरित्रातील अनेक प्रसंगाची घेतली ग्रामस्थांनी अनुभूती!

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
भंडारा,
shri ram katha थंडी आपल्या तोऱ्यात आहे. म्हणजेच दिवसेंदिवस हूडहुडी वाढतेच आहे. पण याच गारव्यात एक गाव राम भक्तीने न्हाऊन निघाले आहे. दिवसा गणिक उत्कंठा वाढविणाऱ्या श्रीराम कथेतील अनेक प्रसंगी जिवंतपणे मांडून ग्रामस्थांना राम राज्याची अनुभूती देण्याचा योग चालून आला तो, श्रीराम कथा सप्ताहाच्या निमित्ताने! काही प्रसंगांनी श्रोत्यांना विचार करण्यास भाग पाडले, काहींनी आनंद दिला तर काहींनी ज्ञानवर्धन करून राम चरित्राचा सार सांगीकरण्याचा संदेश!
 

ram katha 
 
 
साहुली या छोट्याशा गावात यंदाचा श्रीराम कथा सप्ताह अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. संपूर्ण सप्ताहाचे प्रवचन ह.भ.प. शंकरराव कावळे महाराज यांच्या प्रभावी, सोप्या आणि भावपूर्ण शैलीत झाले. केवळ कथा वाचन नाही तर सहकारी कलवतांच्या मदतीने काही प्रसंग जिवंतपणे साकारण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कथेमुळे श्रीरामांचे आदर्श जीवन, त्यांची करुणा आणि धर्मनिष्ठा स्पष्टपणे सर्वांसमोर उभी राहिली.
गाव अवघ्या काही लोकसंख्येचे असले तर प्रत्येक घरातील सदस्य या श्रीराम कथेच्या सभामंडपात दिसत होता. आपल्या घरचा सोहळा याच भावनेतून संपूर्ण गाव सलग 7 दिवस सहभागी झाले होते. गावातील लोकांचा प्रचंड उत्साह आणि सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने मनापासून दिलेले योगदान यामुळे कथा सप्ताह अधिक भव्य, सुंदर आणि यशस्वी तर झालाच पण आजही श्रीराम कथा, भागवत सप्ताह ही प्रथा ग्रामीण जपून ठेवताहेत हे स्पष्ट झाले.
गावातील सर्व समाजाच्या सहकार्याने साकारलेल्या चित्ररथांनी एक वेगळी शोभा सोहळ्याला आली. रामायणातील प्रसंगांचे जिवंत दर्शन घडवणारे चित्ररथ अत्यंत आकर्षक, सुंदर आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या ठरले. युवकांची उत्कृष्ट व्यवस्था, महिलांचे मंत्रमुग्ध करणारे भजन-कीर्तन आणि मुलांचा आनंद यामुळे वातावरण अधिक भक्तिमय बनले. संध्याकाळी आरतीच्या वेळी साहुली गाव दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघत होते.shri ram katha बाहेरगावाहून आलेल्या भक्तांनी साहुलीतील प्रेमळ आदरातिथ्य, एकता आणि संस्कृतीचे मनापासून कौतुक केले. प्रवचनातील धर्म, सदाचार, कर्तव्य आणि मानवी मूल्यांचे संदेश सर्वांना प्रेरणादायी ठरले. एकूणच काय तर सात दिवस भक्ती रसात न्हाऊन निघालेल्या या गावातील वातावरण राममय झाले होते, हे नक्की!