विद्यार्थी घेऊन जाणारी बोलेरो पलटी; ८ जण जखमी

wardha-karate-accident गाडीने २ ते ३ वेळा पलटी खाल्ली

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
 
wardha-karate-accident वर्धेत आयोजित कराटे स्पर्धेकरिता आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू परत जात असताना हिंगणघाट मार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बोलेरोला अपघात झाला. यात ८ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना काल रविवार १४ रोजी रात्री झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ७ ते ११ वयोगटातील ७ मुलं व १ मुलगी वर्धेतील हरिराम टॉवर येथे सुरू असलेल्या कराटे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता करिता आले होते.
 
 
 
wardha-karate-accident
 (अपघातानंतर गाडीची झालेली भीषण दुरवस्था)
 
wardha-karate-accident सायंकाळी स्पर्धा झाल्यानंतर रात्री जेवण करून परत जात असताना वर्धा-हिंगणघाट रोडवरील मिरापूर जवळ बोलेरो वाहनाला रात्री ११ वाजता अपघात झाला. गाडीने तब्बल दोन ते तीन वेळा पलटी खाल्ली. ५ मुले किरकोळ तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच मंगेश भडके, शुभम रा. सोनेगाव (स्टेशन) यांनी रुग्णवाहिकेतून सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले.