कृष्णपेठ धूळ यात्रेत भक्तांचा मळा, हनुमंत चरणी नतमस्तक!

wardha-samudrapur-jatra लालनाला प्रकल्पाच्या कुशीत हजारो भक्त

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
समुद्रपूर, 
 
wardha-samudrapur-jatra वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर उसेगाव (कोरा) येथे लालनाला प्रकल्पाच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात भरणारी धूळ यात्रा आजही नित्यनेमाने कायम आहे. गेल्या ८६ वर्षापासून हनुमान मंदिर परिसरात भरणारी यात्रा १५ डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हजारो भाविकांची हनुमंतरायाच्या दर्शनासाठी रीघ लागली होती. भाविकांनी परंपरेप्रमाणे पानगे आणि गोड प्रसाद हनुमंताला नैवद्य दाखवला.
 
 
 

wardha-samudrapur-jatra 
 
 (यात्रेचे मनोहारी दृश्य )
 
wardha-samudrapur-jatra विदर्भातील विविध जिल्ह्यातून हजारो भाविक कुटुंब नवस घेऊन आले होते. या यात्रेच्या निमित्ताने आयोजकांनी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत वसलेले उसेगाव येथील हनुमान मंदिर विदर्भात सुप्रसिद्ध मानल्या जाते. मंदिर परिसरातील हजारो भाविकांचे स्वयंपाक आणि विविध दुकानाची रेलचेल होती. ग्रामीण जीवनशैलीचे आनंद सोहळा येथे पहावयास मिळाला. आधुनिक बदलती जीवन शैलीत पारंपारिक उत्सव तेवढेच नामशेष झाल्याचे चित्र असले तरी दरवर्षी मार्गशीष महिन्याचे शेवटच्या सोमवारी कृष्णपेठ यात्रेत एकदा आलेला प्रत्येक माणूस पुन्हा येतोच हे आज येथे पहावयास मिळाले.
 
 
 
wardha-samudrapur-jatra यात्रेनिमित्त शेजारच्या गावात जणू दिवाळी होती तर तेवढाच हर्ष आनंद परिसरातील नागरिकात दिसून येत होता. लहानग्याची खेळणी, मोठ्यांना आवडणार्‍या वस्तू विक्रीसाठी आल्या होत्या. यात्रेनिमित्याने भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने दररोज भजन, पुजन, कीर्तन, भारुड, हरिपाठ आदी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गोमेद पाटील यांच्यासह तगडा पोलिस बंदोबस्त तैनात होता.