कमी किंमतीत साेन्याची खरेदी पडली महागात

- व्यावसायिकाची 35 लाखांनी फसवणूक

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
gold low price नागपुरातील एका व्यवसायिकाला स्वस्तात साेने खरेदी करण्याचा माेह नडला. एका टाेळीने व्यावसायिकाला जाळ्यात ओढून नकली साेने देऊन 35 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी अजनी पाेलिसांनी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादी प्रमाेद भूते (63, ओंकारनगर) यांच्या ओळखीचा आराेपी विजय बाबाराव घाेगले (55, रा.तराेडी खुर्द) याने 3 ऑक्टाेबर 2025 मध्ये भेट घेतली. विजयने माेबाईलवर आसाम राज्यातील गुवाहटी शहरातील एका खाेदकामात साेन्याची विट सापल्याचा व्हिडिओ दाखवला.
 
 

गोल्ड  
 
 
ते साेने स्वस्तात विक्री करीत असल्याची माहिती दिली. त्यावर प्रमाेद भूते यांचा विश्वास बसला. 8 ऑक्टाेबरला प्रमाेद आणि विजय हे दाेघेही गुवाहटीला गेले. तेथे एक मूकबधीर युवक, राजीव भाई आणि संगीता नावाचे तिघांची भेट घेतली. त्यांनी खाेदकामात सापडलेली साेन्याची विट दाखवली. त्यातील 200 मीली ग्रॅम तुकडा ताेडून त्यांना तपासण्यासाठी दिला.gold low price त्यानंतर दाेघेही नागपुरात आले. शहरातील नामांकित सराा व्यावसायिकाकडे जाऊन ते तुकडे तपासले असता चाेवीस कॅरेटचे साेने असल्याची खात्री झाली.
35 लाखांचे साेने घेतले विकत
प्रमाेद भूते यांनी 35 लाख जुळवले आणि विजयला घेऊन 24 ऑक्टाेबरला पुन्हा गुवाहटी गाठले. एका लाॅजमध्ये तीच टाेळी पुन्हा भेटली आणि साेन्याची विट दिली. 35 लाख रुपये घेऊन टाेळी पसार झाली. त्यानंतर भूते हे नागपुरात परतले. त्यांनी ती विट सरााकडे नेऊन तपासली असता ती नकली निघाली. अशाप्रकारे भूते यांची 35 लाखांनी फसवणूक झाली. अजनी पाेलिसांनी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.