विदर्भात थंडीचा कडाका कायम!

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
पुणे, 
Cold weather in Vidarbha महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या लाटीमुळे नागरिकांना जोराचा गारवा अनुभवायला मिळत आहे. विशेषतः विदर्भात, नागपूर,अमरावती, यवतमाळ आणि अन्य भागांमध्ये किमान तापमान ९–११ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही हवामान थंड असल्याचे जाणवत आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, आज नाशिकमध्ये तापमान ८.८°C, पुण्यात ९.४°C आणि अहिल्यानगरमध्ये ८.५°C नोंदवले गेले. विदर्भात नागपूरचे तापमान ९.६°C, अमरावती ११.३°C आणि यवतमाळ १०.०°C असे आहे. कोकणातही गारवा अनुभवायला मिळत असून, मुंबईत सीएलबीमध्ये २१.७°C तर एससीझेडमध्ये १७.०°C तापमान नोंदले गेले. महाबळेश्वरमध्ये १२.१°C नोंदवले गेले असून त्याचा परिणाम पुण्यातील हवामानावरही दिसून येत आहे.
 
 


cold alert 
हवामान केंद्राने सांगितले की, पुढील २४ तासांत तापमानात दोन-तीन अंशांनी किंचित वाढ होईल. मात्र पुढील दोन दिवसांत किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही, त्यामुळे हवामान थंड राहील. पुढील चार-पाच दिवसांत कमाल तापमान हळूहळू वाढेल, तर किमान तापमानात नंतर एक-दोन अंशांची घसरण होऊ शकते. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा यांसारख्या भागांमध्ये थंडीचा जोर वाढला असून नागरिकांनी शेकोट्या आणि उबदार कपड्यांचा उपयोग करून थंडीशी सामना सुरू केला आहे. महाबळेश्वरमधील गारवा पुण्यातील हवामानावरही परिणाम करत असल्याने पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे.