तभा वृत्तसेवा
नेर,
dr mirza संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या खुमासदार शैलीने रसिक श्रोत्यांना हास्यरंगात बुडवून टाकणारे वèहाडी कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना त्यांचे जन्मगाव धनज-माणिकवाडा येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. फकिरजी महाराज संस्थानात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या परिवारातील त्यांच्या कन्या शिक्षक हुमा जबीन आणि मुलगा रमीझ व नातेवाईक उपस्थित होते. प्रास्ताविकात माहिती उपसंचालक प्रविण टाके यांनी फकिरजी महाराज संस्थान येथे डॉ. मिर्झा यांचे एक साहित्य दालन उभारले जावे अशी इच्छा बोलून दाखवली.
उपजिल्हाधिकारी मस्के यांंनी डॉ. मिर्झांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा देताना त्यांच्या व्यक्तीमत्वातील पैलू उलगडले. हुमा व मुलगा रमीझ यांनी एक वडील म्हणून दिलेले संस्कार व एक साहित्यिक म्हणून त्यांचे कार्य आम्हा सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचे भावोद्गार काढले. या प्रसंगी त्यांच्या तीन अप्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.dr mirza यावेळी त्यांचे कविमित्र बबन चौधरी, जमीर बेग मिर्झा, सुरेश सहारे, प्रविण चांदोरे, सचीव रविंद्र बोबडे, अनिल नाल्हे, संतोष ढेंगे, बाबू जैत, पत्रकार व साहित्यिक संतोष अरसोड यांनी श्रद्धांजली अर्पण केली. संचालन रुपेश कावलकर व प्रविण तिखे यांनी केले. तर आभारप्रदर्शन रफिक शहा यांंनी मांडले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कावलकर विश्वस्त व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.