जळगाव,
drowned at a nursery in Jalgaon भडगाव शहरातील आदर्श कन्या विद्यालयाच्या नर्सरीतील दोन चार वर्षीय विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर मयंक वाघ आणि अंश सागर तहसीलदार हे दोघे आज सकाळी सुमारे ११ वाजता शाळेच्या परिसरालगत असलेल्या नाल्यात पडून बुडाले. प्राथमिक माहिती अशी आहे की, पुराच्या पाण्यामुळे नाल्याजवळची संरक्षण भिंत कोसळली होती. बाथरूमसाठी ते नाल्याजवळ गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते नाल्यात पडले.
घटनेनंतर दोघांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पालकांनी शाळा प्रशासनावर दुर्लक्ष आणि भोंगळ कारभार केल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. भडगाव शहरात ही घटना शोककळा निर्माण करणारी ठरली असून नागरिक आणि पालक नाल्यालगत सुरक्षात्मक उपाययोजना न केल्याबाबत नाराज आहेत. पालकांनी जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.