लिंक्डइनवर ‘फुल-टाइम गर्लफ्रेंड’ची व्हॅकन्सी, पोस्टवर आले २६ अर्ज

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
गुरुग्राम, 
girlfriend-vacancy-on-linkedin हरियाणातील गुरुग्राम येथील एका व्यक्तीने लिंक्डइनवर केलेल्या एका आगळ्यावेगळ्या पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीने थेट ‘फुल-टाइम गर्लफ्रेंड’साठी चक्क नोकरीसारखी जाहिरात टाकली. विशेष म्हणजे ही पोस्ट विनोद म्हणून पाहिली जात असतानाही आतापर्यंत तब्बल 26 जणांनी या ‘व्हॅकन्सी’साठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. नंतर ही पोस्ट रेडिटवर शेअर करण्यात आली आणि तिचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

girlfriend-vacancy-on-linkedin 
 
ही जाहिरात अगदी प्रोफेशनल जॉब लिस्टिंगप्रमाणे तयार करण्यात आली होती. लोकेशनमध्ये गुरुग्राम नमूद होते, हायब्रिड वर्कचा पर्याय देण्यात आला होता आणि ‘ईझी अप्लाय’ बटणही उपलब्ध होते. पहिल्यांदा पाहताना ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीची साधी नोकरीची जाहिरात वाटावी, अशीच तिची मांडणी होती. त्यामुळेच ही पोस्ट लोकांच्या चर्चेचा विषय ठरली. पोस्टमध्ये ‘फुल-टाइम गर्लफ्रेंड’च्या जबाबदाऱ्याही नोकरीच्या भाषेत नमूद करण्यात आल्या होत्या. girlfriend-vacancy-on-linkedin भावनिक जिव्हाळा टिकवणे, मोकळेपणाने आणि प्रामाणिक संवाद साधणे, एकमेकांना साथ देणे, परस्पर सन्मान राखणे आणि एकत्र वेळ घालवणे अशा गोष्टी त्यात नमूद होत्या. नात्यातील सर्वसाधारण अपेक्षा कॉर्पोरेट स्टाइलमध्ये मांडण्यात आल्याने लोकांचे लक्ष वेधले गेले. योग्यतेच्या निकषांमध्येही मजेशीर बाबी होत्या. चांगली भावनिक समज, समोरच्याचे नीट ऐकण्याची सवय, सहानुभूती, गरज पडल्यास समंजसपणा दाखवण्याची क्षमता आणि उत्तम विनोदबुद्धी यांचा त्यात समावेश होता. तसेच स्वतःच्या आणि जोडीदाराच्या ध्येयांमध्ये समतोल राखण्याची अटही घालण्यात आली होती.
लिंक्डइनसारख्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर अशी पोस्ट करण्यात आल्यामुळेच ती अधिक व्हायरल झाली. girlfriend-vacancy-on-linkedin सोशल मीडिया युजर्सनी या पोस्टकडे विनोद, उपरोध आणि क्रिएटिव्ह विचार म्हणून पाहिले. अनेकांनी कमेंटमध्ये आजच्या काळात नोकरी, लग्न आणि डेटिंग यांच्यातील सीमारेषा हळूहळू पुसट होत चालल्याचे मत व्यक्त केले. काही युजर्सचे असेही म्हणणे आहे की ही पोस्ट जरी मजेशीर असली, तरी त्यामध्ये एका चांगल्या आणि हेल्दी नात्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची यादी दडलेली आहे. फरक एवढाच की इथे प्रेमाच्या भाषेऐवजी कॉर्पोरेट टर्म्सचा वापर करण्यात आला आहे. सध्या ही पोस्ट इंटरनेटवर चर्चेचा मोठा विषय ठरत आहे.