गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Gayatri Datar's engagement मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनसराईचा माहोल पाहायला मिळत आहे. आता आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची बातमी समोर आली आहे. ‘तुला पाहते रे’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार हिने आपल्या प्रेमाची गुपचूप कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गायत्री दातार हिने सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोमध्ये तिने साखरपुड्याची अंगठीही फ्लॉन्ट केली असून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नाही.
 
 
gayatri datar
 
फोटो शेअर करताना गायत्रीने भावूक कॅप्शन लिहिलं आहे. “माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे. हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस आहे,” असे शब्द तिने कॅप्शनमध्ये नमूद केले आहेत. तसेच ११ डिसेंबर रोजी साखरपुडा पार पडल्याची माहितीही तिने दिली आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये गायत्रीच्या होणाऱ्या जोडीदाराचा चेहरा स्पष्ट दिसत असला, तरी त्याची ओळख आणि नाव अभिनेत्रीने अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे. साखरपुड्याची बातमी समजताच गायत्रीच्या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.