तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
gunjan deshpande येथील वीणा व श्याम देशपांडे यांची कन्या गुंजन हिने वेगळ्या कायदा विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. गुंजन देशपांडे हिने पुणे येथील मॉडर्न लॉ कॉलेजमधून पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाद्वारे बीए एलएलबी केले. त्यानंतर तिने पुणे विद्यापीठातून एलएलएम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून ‘कॉपिराईट प्रोटेक्शन इन द डिजिटल एज विथ रेफरन्स टू द एंटरटेनमेंट इंडस्ट्री इन इंडिया’ या विषयात पीएचडी करून डॉक्टरेट मिळविली आहे.gunjan deshpande या संदर्भात गुंजन देशपांडे हिला राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. बिंदू रोनाल्ड, संशोधन अधिष्ठाता डॉ. सुब्रमण्यम आणि पीएचडी गाईड डॉ. अशोक वाडजे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.