दोन टोळ्यातील ९ सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
गोंदिया,
Habitual criminals : सराईत गुन्हेगार तसेच अवैध हातभट्टी दारू निर्माते व विक्रेत्या दोन टोळ्यातील एकूण ९ आरोपींना महाराष्ट्र पोलिस अधिनिश्म १९५१ चे कलम ५५ अन्वये दोन महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश १५ डिसेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिले आहेत.
 
 
 
 
KL
 
 
 
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी, वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा व गुन्हेगारांवर वचक राहावा, यासाठी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील बरबसपुरा व आसोली येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना दोन महिन्यासाठी जिल्ह्यातून दोन महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
 
 
यात बरबसपुरा येथील टोळीतील आरोपी इंद्रपाल रूपचंद दमाहे (५०), भरतलाल साहेबलाल दमाहे (३८), कांतीलाल इंद्रपाल दमाहे (२०), सुदर्शन नेवालाल मच्छिरके (२५) व मिथून इंद्रपाल दमाहे (२८) यांच्यावर भारतीय दंडविधान दंड संहिता, पोक्सो, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत सन २०१५ व २०१६ मध्ये १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असतानाही त्यांचे गुन्हेकारी कृत्ये सुरूच आहे. तसेच आसोली येथील टोळीतील आरोपी देविंद्राबाई वसंत खरोले (६०), प्रविण वसंत खरोले (३३), प्रदिप उर्फ मोटू शिवण गणवीर (३०) व सुदेश ग्यानीराम गडपायले (५०) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातंर्गत १५ गुन्हे नोंद असून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या टोळ्यातील आरोपींमुळे आगामी काळात जिल्ह्यातील शांतता, सुव्यवस्था बाधित होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भमरे यांच्या निर्देशानुसार, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ४४ अन्वये दोन महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.