शहरात जडवाहतुकीवर पूर्णतः बंदी घालावी

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
गडचिरोली,
heavy vehicles शहरात जडवाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. जडवाहतुकीसाठी ठराविक वेळ निश्‍चित करावी किंवा शहरातील जडवाहतुकीवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी एमआयएम पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आरटीओंकडे निवेदनातून केली आहे.
 
 
heavy vehical
 
 
याप्रसंगी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, तौफिक सय्यद, अनिल संतोषवार, तेजराम नेतनकर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक सय्यद, करण मोहुर्ले, महिला जिल्हाध्यक्ष आयशा अली सय्यद आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून सूरजागड लोहप्रकल्पासह इतर जड वाहनांमुळे शहरात सतत वाहतूक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. जडवाहतुकीशी संबंधित अपघातांत आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
प्रशासनाने यावर उपाययोजना करून जडवाहतुकीवर बंदी घालावी, अन्यथा एमआयएम पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.heavy vehicles यावेळी कार्याध्यक्षा शगुप्ता शेख, जिल्हा उपाध्यक्ष जया कोंडे, जिल्हा सचिव नसीमा शेख, जिल्हा महासचिव उज्वला सिरसाठ आदी उपस्थित होते.