मजुराचा मुलगा मयूर मडावीची राष्ट्रीय हॉकी स्तरावर भरारी

साई विद्यालयाचे शालेय महाराष्ट्र राज्य हॉकी संघात प्रतिनिधित्व

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
mayur-madavi : लोहारात वास्तव्यात असलेल्या व सूतगिरणीत मजुरी कामगार म्हणून रोजंदारी करणाèया आईने हलाखीच्या परिस्थितीतही मुलाला हॉकीचे धडे देऊन राष्ट्रीय स्तरावर भरारी घेण्यास मदत केली.
 
 
 
k
 
 
 
शारदा मडावी असे त्याच्या आईचे नाव असून मयूर मडावी असे त्या हॉकीपटूचे नाव आहे. शारदा यांनी आपल्या मुलाने शालेय खेळात प्रगती करावी अशी इच्छा होती. त्यांनी तुटपुंज्या मिळकतीतून श्री साई माध्यमिक विद्यालयात हॉकीच्या सरावासाठी मयूरला प्रोत्साहन दिले.
 
 
मयूरही कठोर मेहनत, दृढ आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावार राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. अहिल्यानगर येथील गौतमनगर येथे झालेल्या 14 वर्षांआतील शालेय राज्य हॉकी स्पर्धेत त्याची निवड झाली. तसेच 69 व्या शालेय राष्ट्रीय मुलाचा हॉकी स्पर्धा मध्यप्रदेश राज्यातील टिकमगर येथे 21 ते 27 डिसेंबरदरम्यान होणाèया शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी 14 वर्षांआतील मुलाच्या हॉकी संघात साई विद्यालय व आकाश चिकटे स्पोर्टस् अकादमीच्या मयूर मडावीची निवड झाली आहे.
 
 
या यशस्वी खेळाडूला शाळेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब इंगोले, माजी मुख्याध्यापक मनोज इंगोले, मुख्याध्यापक अजय भटकर, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे, शारीरिक व क्रीडाशिक्षक जितेंद्र सातपुते यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
 
 
तो आपल्या यशाचे श्रेय आई, बहीण विशाखासह जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष तथा प्राचार्य मनोज येंडे, क्रीडाधिकारी चैताली राऊत, क्रीडा अधिकारी सचिन हरणे, डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. संतोष भोसले, डॉ. धिरज बत्रा, शाळेचे वनदेव माघाडे, विजय चौधरी, अभय दुधाटे, अर्चना डहाके, जयश्री देशमुख, वैशाली शहाडे, किशोर यादव, रवी उईके, सचिन भेंडे, हॉकीपटू विकी गिरी, प्रथमेश ठोकळ यांना देतो.