नागपूर,
power-supply-interrupted : महावितरणतर्फे नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा बुधवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी काही तास बंद राहणार आहे. या कालावधीत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
- महाल विभाग
सकाळी ९ ते १ : एनआयटी गार्डन, महाकाळकर सभागृह, बसवेश्वर पुतळा, मधुबन अपार्टमेंट, शिवाजी सभागृह, दत्तात्रय नगर, नवीन सुभेदार, समर्थ वाटिका.
सकाळी १० ते २ : नरेंद्र नगर, ८५ प्लॉट, विजयानंद, अरविंद, उमंग, डोबी नगर, पीएमजी, फ्रेंड्स, साईकृपा, मिलिंद सोसायटी.
सकाळी ९ ते १२ : गाडगेबाबा नगर, न्यू डायमंड नगर, रतन नगर, भाग्यश्री नगर, मित्र विहार.
- कॉग्रेसनगर विभाग
सकाळी ८ ते ११ : गांधीनगर, अंबाझरी टेकडी, समता लेआउट, बजाजनगर.
सकाळी ९ ते १२ : एनआयटी लेआउट, त्रिमूर्ती नगर, प्रियदर्शनी नगर, भामटी वस्ती, विविध लेआउट्स.
सकाळी ८ ते १२ : संचयनी, टेलिकॉम नगर, रवींद्र नगर, स्वावलंबी नगर, जयप्रकाश नगर, सीता नगर, हायकोर्ट सोसायटी, राहुल नगर, श्रीराम नगर, महात्मा फुले नगर आदी भाग.
- सिव्हिल लाईन्स विभाग
सकाळी १० ते २ : गायत्री कॉलनी, हजारीपहाड, अनुशक्ती नगर, मलबार कॉलनी, फूटाळा परिसर.
सकाळी ९ ते १ : योगेंद्र नगर, आदिवासी नगर, भूपेश नगर.
याशिवाय एमआयडीसी उपकेंद्रातील बी-झोनच्या काही भागातही सकाळी १० पासून वीजपुरवठा बंद राहील. गुरुवार, दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १ महाल विभागातील उदयनगर वाहिनीवरील काही भागात, तर शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर रोजी ईएसआय वाहिनीवरील तुपकर चौक परिसरात वीज बंद राहणार आहे. महावितरणने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.