केरळ त्रिवेंद्रम येथे मास्टर्स अ‍ॅथलेटिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
athletics championships मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारा चंद्रशेखरन नायर व युनिव्हर्सिटी स्टेडीयम त्रिवेंद्रम केरळ येथे 28 ते 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी 2026 ला 46 व्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स असोशिएशनच्या वतीने 26 ते 28 डिसेंबरला डिस्ट्रिक स्पोर्ट स्टेडीयम वाशीम येथे 45 वी स्टेट चाम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
 
 

athlitics 
 
 
मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पोर्ट अ‍ॅन्ड वेल्फेअर असोशिएशन यवतमाळच्या माध्यमातून 45 व्या वाशिम राज्य स्पर्धेचा प्रवेश अर्ज भरून पदकप्राप्त मास्टर्स यांना राष्ट्रीय स्पर्धा केरळ येथे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.athletics championships स्पर्धेत सहभागासाठी संघटनेचे अध्यक्ष गुलाब भोळे, कार्याध्यक्ष देवेंद्र चांदेकर, साहेबराव राठोड, उपाध्यक्ष देवानंद तांडेकर, मधुकर मोरझडे, सचिव नरेंद्र भांडारकर, कोषाध्यक्ष शीला पेडणेकर, शीतल दरेकर, अनुराधा तांबेकर, पांडुरंग कवरासे, शीला खडसे यांच्याशी संपर्क साधावा.