तभा वृत्तसेवा
दारव्हा,
joined rcp तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकाèयांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडला.
तालुक्यातील राजकीय वातावरणात सक्रिय भूमिका बजावणारे तसेच सामाजिक-धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले अनेक पदाधिकारी या प्रवेश सोहळ्यात सहभागी झाले होते. मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष रणजित झोंबाडे, मनसे माजी तालुकाध्यक्ष ईश्वर राठोड, मनसेचे विशाल चव्हाण, भाजपा बुथप्रमुख विनोद जाधव, अशोक जोगदंड यांच्यासह विविध राजकीय पक्षातील पदाधिकाèयांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याला प्रदेश उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, बोरी बाजारसमितीचे सभापती विराज घुईखेडकर, तालुकाध्यक्ष प्रा. चरण पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे दारव्हा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.