शिवसेना (उबाठा) मोठी कारवाई

पक्षविरोधी कारवायांमुळे संतोष ढवळेंची शिवसेनेतून हकालपट्टी

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
shiv sena शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभाप्रमुख संतोष ढवळे यांनी यवतमाळ नगर परिषद निवडणुकीदरम्यान पक्षशिस्त धाब्यावर बसवत, थेट शिवसेनेच्या अधिकृत नगर परिषद अध्यक्ष उमेदवार व शिवसेना नगरसेवकांच्या विरोधात जाऊन काँग्रेस पक्षाचा उघड प्रचार केल्याचे गंभीर आरोप सिद्ध झाल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हासंपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
 
गायकवाड
 
 
यावेळी जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, राजेद्र घोटे, गजानन पारिल, चेतन सिरसाठ, तुषार देशमुख, शोएब शाह, सलमान शेख, दिनेश चव्हाण, गजानन पोटे, साजिद रहमान उपस्थित होते. पुढे राजेंद्र गायकवाड म्हणाले, हा प्रकार म्हणजे थेट पक्षद्रोह असून शिवसेनेच्या विचारधारेस आणि नेतृत्वास आव्हान देणारा आहे. त्यामुळे पक्षविरोधी व शिस्तभंगाच्या कारवाईबद्दल संतोष ढवळे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे.shiv sena शिवसेनेत पक्षशिस्त सर्वोच्च असून गद्दारी व संधीसाधूपणाला अजिबात थारा दिला जाणार नाही, असा कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.