महिला शेतकऱ्यांचा दोन एकर ऊस जळून खाक

तालुक्यातील विठोडी (बोरगाव) येथील घटना

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
sugarcane crop तालुक्यातील विठोली (बोरगाव) शेतशिवारातील महिला शेतकरी अर्चना पुरुषोत्तम इंगळे यांच्या शेतातील दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवार, 14 डिसेंबरला उघडकीस आली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आधीच अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, अजूनपर्यत शेतकऱ्यांना नूकसानीचा शासकीय मोबदला देखील मिळाला नाही.
 
 
विठोली
 
 
त्यात ऊस जळण्याचे संकट यामुळेच महिला शेतकरी अर्चना पुरुषोत्तम इंगळे हवालदिल झाल्या आहेत. शासनाने त्वरित पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी सुनील राठोड यांनी शेतातील ऊस जळाल्याची पाहणी केली. नुकसानीचा प्राथमिक अहवाल तहसीलदाकडे देणार असल्याचे सांगितले. शेतातील ऊसाला आग कशामुळे लागली, याचे कारण कळू शकले नाही.sugarcane crop शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
-----