श्री शक्तीपीठामध्ये वंदे मातरम व्याख्यान

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
नागापूर,
Vande Mataram lecture “वंदे मातरम” या षडाक्षरी मंत्राने इतिहास घडवला आहे, तोच मंत्र आज प्रत्येक भारतीयांचा श्वास बनला आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्रा जोशी यांनी केले.
 
Shri Shaktipeeth
 
श्री शक्तीपीठात आयोजित ‘वंदे मातरम’ या विषयावर व्याख्यानात त्या बोलत होत्या. व्याख्यानात चित्रा जोशी यांनी वंदे मातरमचा इतिहास, त्यामागील भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. Vande Mataram lecture त्यांनी सांगितले की, “माता भूमी पुत्रोहं पृथव्याम” या मंत्रातील ‘पृथ्वी’, ‘पार्थिव’ शब्दातून आपल्या मातृभूमीशी असलेला नाते अधोरेखित होते. ही माती आपली आई असून तिचे दुःख, आपले दुःख मानणे आणि तिचा सतत स्मरण ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.
 
चित्रा ताईंनी पुढे सांगितले की, समाज घडवणारे नेते, शिक्षक, लेखक आणि वक्ते यांनी वंदे मातरमला आपला मंत्र बनवून देशभक्तीच्या भावनेने लोकांना प्रेरित केले. बंकिमचंद्रनी लिहिलेले हे स्फूर्तिदायक गीत १८७६ मध्ये बंगालच्या एका पत्रिकेत प्रसिद्ध झाले, १८७९ मध्ये आनंदमठ कादंबरीत विस्तृत विवेचनासह प्रसिद्ध झाले. Vande Mataram lecture १८९६ मध्ये काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायले. पुढे काही अधिवेशनात या गीतावर बंदी घालण्यात आली, परंतु वंदे मातरम स्वातंत्र्यलढ्याचा एक नारा म्हणून भारतातील प्रत्येक क्रांतिकारीत उमटत राहिला.
 
चित्रा जोशी यांनी वंदे मातरम म्हटल्यामुळे होणारे प्रतिकूल परिणाम, शिक्षण सोडावे लागणे, आणि ‘वंदे मातरम’ नावाची पत्रिका बंद होणे अशा घटनांची सविस्तर माहितीही व्याख्यानात दिली. आजही १५० वर्षांनंतर ही गीते लोकांच्या मनात अढळ स्थान राखून आहेत, यावर चित्रा जोशी यांनी समाधान व्यक्त केले. Vande Mataram lecture कार्यक्रमाची सुरुवात स्वाती पटवर्धन यांच्या “भारत वंदे मातरम” या गीताने झाली. प्रास्ताविक  व पाहुण्यांचा परिचय वृंदा घोलप यांनी दिला, तर आभार प्रदर्शन डॉ. गरिमा सप्रे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरमच्या गायनाने झाली.

सौजन्य: गौरी बेलन, संपर्क मित्र