अन् मुंबईच्या सायबांना बोरमध्ये वाघोबाचे दर्शन!

* अधिवेशनातून विरंगुळा

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
sighting-of-a-tiger : बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी कॅटरिना वाघिणीची ओळख आहे. तिचे दोन छावे १३ ते १४ महिन्यांचे झाले आहेत. याच रुबाबदार वाघांच्या कुटुंबाचे दर्शन बोर व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी करणार्‍या होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या तीन बड्या अधिकार्‍यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देत वाघोबा बघितला.
 
 
k
 
सन २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पात वर्धा व नागपूर जिल्ह्यात क्षेत्र येते. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात सुमारे २० हून अधिक प्रौढ वाघ आहेत. बोरची महाराणी अंबिका, राणी कॅटरिना, पिंकी वाघीण, युवराज नामक वाघ यासह बिबट, अस्वल, चितळ, सांबर आदी वन्यजीवांची एक झलक बघण्यासाठी पर्यटक बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देत आनंद लुटतात. हल्ली बोरची राणी कॅटरिना व तिच्या दोन छाव्यांचे दर्शन पर्यटकांना दररोजच होत आहे.
 
 
हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून नागपूर येथे आलेले मुख्य वनसंरक्षक (दुय्यम संवर्ग) ऋषिकेश रंजन, वनविभागाच्या सचिवांचे ओएसडी सोनल गावंडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा आनंद लुटला. या बड्या अधिकार्‍यांना कॅटरिना व तिच्या दोन छाव्यांचेही दर्शन झाले. विशेष म्हणजे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वर्ध्यात जिल्हाधिकारी म्हणून सेवा दिली आहे. आपल्या छाव्यांना कॅटरिना वाघिण बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात राहूनच शिकारीचे धडेही देत आहे.