अंतराळात महिलांचा मुकाम जास्त : सुकल्प करंजेकर

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
sukalp-karanjekar : आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो. परंतु, अनेक बाबतीत पुरुषांनाच उजवे दाखवतो. पुरुषांच्या शतीचा दाखला दिल्या जातो. परंतु, काही बाबतीत महिलाही आघाडीवर आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात पुरुषांच्या तुलनेत जगातील महिलांचाच मुकाम अंतराळात जास्त राहिला असल्याचे प्रख्यात अभियंता, लेखक व विज्ञान प्रबोधक सुकल्प करंजेकर यांनी सांगितले. स्थानिक स्व. विजयराव मुडे फाउंडेशनतर्फे केसरीमल कन्या शाळेत ‘आपलं विश्व आणि त्याची नवलकथा’ या विज्ञान प्रबोधनात्मक कार्यक्रमात सुकल्प करंजेकर यांनी विद्यार्थ्यांना सोप्या व रंजक भाषेत विश्वनिर्मिती, अंतराळ विज्ञान व मानवी अंतराळ प्रवासाविषयी मार्गदर्शन केले.
 
 
JK
 
करंजेकर यांनी मानवाने अंतराळात टाकलेले पहिले पाऊल तसेच आजवर सर्वाधिक काळ महिला अंतराळवीरांनी अंतराळात केलेल्या मुक्कामाची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहल निर्माण केले. करंजेकर यांनी देश-विदेशात दीर्घकाळ नोकरी केल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा भाषेत त्यांनी आपलं विश्व आणि त्याची नावलकथा हे विज्ञान विषयक पुस्तक लिहिले असून ते आज अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
 
 
स्व. विजयराव मुडे फाउंडेशन ही संस्था महिला, युवक, विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण, विज्ञानप्रबोधन, व्यक्तिमत्त्व विकास, मार्गदर्शन शिबिरे तसेच शेतकर्‍यांसाठी जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य फाउंडेशनकडून केले जाते. अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या संधींची दारे उघडून देण्याचा फाउंडेशनचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
 
 
प्रास्ताविक फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शेषराव बिजवार यांनी मानले. संचालन प्राजता पुसदकर यांनी केले. यावेळी केसरीमल कन्या शाळेच्या प्राचार्य धनिष्ठा बोरुटकर, सुजाता जोशी, पूर्णिमा भामकर, मोहित वानखेडे आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जाणीव, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि भविष्य घडवण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.