वर्धा,
vijay-granth : संत गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक जागतिक पारायण वर्धा येथे जानेवारी महिन्याच्या दुसरा रविवार ११ जानेवारी २०२६ रोजी दादाजी धुनिवाले सभागृह धुनिवाले चौक येथे आयोजित करण्या आला आहे. या पारायण सोहळ्यात अवघे १० वर्षे वय असलेली गजानन विजय ग्रंथातील ३६६९ ओव्या मुखोद्गत असलेली सुरभी ढगे चिमुकली सहभागी होणार आहे.
या पारायण सोहळ्यानिमित्त भवानराव देशमुख रा. जयपूर ता. मोटाळा जि. बुलडाणा यांना इ.स. १९०८ मध्ये संत गजानन महाराजांनी स्वतः दिलेल्या पादुकांचे दर्शन पारायण स्थळी भक्तांना लाभणार आहे. तसेच पुणे येथील सुरभी ढगे (१०) हिच्या मुखोद्गत पारायणाने जागतिक पारायण सोहळ्याची सुरुवात होईल.
पारायणासाठी नावे नोंदवू इच्छिणार्या भतांनी प्रशांत महल्ले, श्रीकांत प्रधान, —अनंत बोबडे, राजहंस राऊत, प्रशांत उमक, मनीष तेलरांधे, प्रशांत कातरकर, प्रमोद इंगळे, जीवन शिरसाळे, माधुरी उमक, वैशाली महल्ले, सविता बोबडे, नीलिमा वरफडे, रंजना श्रीवास्तव, अर्चना जोशी, रूपाली गौळकर, यांच्यासोबत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त भतांनी पारायणास बसून श्री चरणी सेवा समर्पित करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सोहळ्याचे आयोजन व यशस्वीतेसाठी संत गजानन महाराज गुरूपौर्णिमा उत्सव समिती, वनलाईफ फिटनेस जिम, शेगाव वारी ग्रुप वर्धा, इवोनित व्हॅल्यू स्टील लिमिटेड कंपनी कर्मचारी स्टाफ, श्री संत गजानन महाराज मित्र परिवार, प्रगती महिला योगा ग्रुप, योगेश मंडप डेकोरेशन व बिछायत केंद्र या संस्था सहकार्य करीत आहेत.