यवतमाळात आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
international-chess-tournament : यवतमाळच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या यवतमाळ आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन कुमार चिंता यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी भूषण श्रीवास, प्रफुल चपाते, रवी सिंघानिया, प्रदीप जतकर, मनीषा आखरे, वर्षा निकम, अ‍ॅड. जीवन पाटील, मोहन केळापूरे यांची विशेष उपस्थिती होती.
 
y16Dec-Buddhibal
 
 
देशभरातून 546 खेळाडूंनी तर तब्बल 174 आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा 14 डिसेंबर रोजी पोदार प्रेप, दर्डा नगर व पोदार इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ यांच्या सहकार्याने पार पडली. या स्पर्धेमुळे यवतमाळ शहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ नकाशावर उमटले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल श्रेयस निकम व संपूर्ण आयोजन समितीचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर ठाणे येथील आंतरराष्ट्रीय मास्टर आकाश शरदचंद्र दळवी यांनी प्रथम बक्षीस पटकावत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
 
 
या स्पर्धेतील पारितोषिक वितरण सोहळ्याला श्रेयस निकम, भूषण श्रीवास, मनीषा आखरे, मंजिरी निकम, अंकिता सुचक, प्रफुल चपाते, शरत बाबू, वर्षा निकम, सुरेश निकम, अ‍ॅड. जीवन पाटील, मोहन केळापुरे, विवेक बोगावार, निवेश गाबडा, सारिका शर्मा, तेजस पाटील तसेच मुख्य पंच प्रवीण ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
या ऐतिहासिक स्पर्धेमुळे यवतमाळ शहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ नकाशावर ठळकपणे उमटले असून, आयोजक व संपूर्ण आयोजन समितीच्या उत्कृष्ट नियोजनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ही स्पर्धा यवतमाळच्या क्रीडा इतिहासातील एक सुवर्णाक्षरी पान ठरली आहे.