तभा वृत्तसेवा
पुसद,
sheshrao-patil-ginning-pressing : बहुचर्चित असलेल्या कै. शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंगच्या अध्यक्षाच्या विरोधात 13 सदस्यांनी यवतमाळ येथील जिल्हा उपनिबंधकांकडे 8 डिसेंबर रोजी ठराव दाखल करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या ठरावावर मंगळवार, 16 डिसेंबर रोजीच्या दुपारी 1 वाजता पुसद येथील कार्यालयात विशेष सभा बोलविण्यात आली होती. त्या सभेत एकमताने ठराव पारित करीत 13 विरुद्ध 0 असे मत झाल्याने संचालक मंडळाकडून विद्यमान अध्यक्ष पायउतार झाले आहे. पुसदच्या इतिहासात पहिल्यांदाच जिनिंग प्रेसिंगच्या अध्यक्षा विरोधात 13 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.

विजय भोपासिंग चव्हाण असे पायउतार झालेले अध्यक्षाचे नाव आहे. कै. शेषराव पाटील मर्यादित पुसदच्या कार्यकारी मंडळ सदस्य पैकी 13 सदस्यांनी विद्यमान अध्यक्ष विजय चव्हाण यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73(1) ड व नियम 67 अन्वय कार्यकारी मंडळाची विशेष बैठक बोलावण्यासाठी यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर 16 डिसेंबर रोजी विचारविनिमय करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात विशेष सभा बोलवण्यात आली होती.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 (10) पोटकलम 4 मधील तरतुदींनुसार बैठकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सहायक निबंध सहकारी संस्थेचे केशव मस्के यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्या ठरावावर चर्चा करण्यासाठी विद्यमान अध्यक्ष विजय चव्हाण उपस्थित होते. अविश्वास ठराव मांडण्यासाठी राजेश सोळंके, संजय लोंढे, शरद पाटील, प्रकाश वायकुळे, इकबाल अहमद खान मिर आलम खान, गुलाब राठोड, प्रकाश बोंबले, अवधूत पाटील, प्रताप देशमुख, संतोष धुळे, दीपक जाधव, विद्या डुबेवार व शांता ठेंगे उपस्थित होते.
यावर संचालक मंडळांनी प्राधिकृत अधिकाèयांसमोर चर्चा करून मते मांडण्यात आली. यात तेराही जणांनी अध्यक्षांच्या विरोधात मत दिले होते. त्यामुळे तो ठराव एकमताने पारित झाला.