आर्वी,
accident : देऊरवाडा मार्गाने आर्वीकडे येणार्या ट्रकने शिकवणीला जात असलेल्या विभूती डागा (१४) या विद्यार्थिनीला धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज १७ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
विद्यार्थिनी विभूती डागा शिकवणी वर्गाकरिता जात असताना देऊरवाडा मार्गाने मागून भरधाव येणार्या एमपी ०९ एचजी ९६६५ क्रमांकाच्या ट्रक चालकाने सायकल स्वार विद्यार्थिनीला धडक दिली. अपघात होताच घटनास्थळावरून ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. पुढे शिवाजी चौकात ट्रक सोडून पसार झाला. याबाबतची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली. तिला उपजिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. त्यानंतर आर्वी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी ट्रकला ताब्यात घेतले. ट्रक चालक फरार असून पोलिस पुढील तपास करीत आहे.